मुंबईतील कोविडच्या जवळपास एक वर्षानंतर महाविद्यालयात प्रवास करण्याचा माझा अनुभव

काल पासून १५ फेब्रुवारी २०२१  राज्य सरकारने घोषणा केल्या नंतर सर्व गोष्टी सर्व सामान्य लोकासाठी उघडल्या जात आहेत, आणि त्याच पहिल्या गोष्टी मध्ये होत ते म्हणजे माझा कॉलेग्जचा पहिला दिवस,आणि लोकल ट्रेनचा  प्रवास,  तर  मी पण  कॉलेजमध्ये अगदी उत्साहित  पोहचण्याचे ठरविले ते पण lockdown नंतरच पहिला प्रवास लोकल ट्रेन पासून,

राहणार ठिकाण कळंबोली, लोकल ट्रेन येणायच ठिकाण मानसरोवर आणि कॉलेजला  जायचं  ठिकाण बांद्रा वेस्ट आणि ह्या सगळीकडे लागणार अंतर ४२. ८ किलोमीटर आणि  जायाला  लागणार कालावधी जेमतेम पकडून दीड किंवा दोन तास पण चक् मला हा प्रवास करायला पहिल्यांदा ३ तासचा आस-पास वेळ गेला, आजची परिस्तिथी अशी झाली आहे कि माणसाच पूर्ण दिवस कामत कमी आणि प्रवासात नुसता पूर्ण वेळ  जातो. 

माझा प्रवास माझा घरा पासून ते मानसरोवर स्टेशन कामोठे पर्यंत माझा scooty वरून झाला, राज्य सरकारने सगळ्या गोष्टीना आता १५ फेब्रुवारी पासून परवानगी दिल्या मुळे झालेली वाहनांमुळे ट्रॅफिक जाम आणि  माणसाची प्रचंड गर्दी त्यामुळे प्रवास करायला खूप त्रासदायक ठरलं. 

मी अर्धा तासांपूर्वी माझे घर सोडले होते.  सकाळी दहाच्या सुमारा मधली वेळ,  मला माझ्या प्रवासासाठी  तिकीट काढण्यासाठी मला तिकीट लाईनमध्ये उभे रहावे लागले कारण अजून मी सरकारी कामगार
(Government workers) आणि कार्यरत ओळख (Working identity) चा पुरावा नसला मुळे मला ट्रेनच मंहिन्याचा पास भेटू शकत नव्हता आणि तसे मी विध्यार्थी गट मध्ये मोडली जात असून, विद्यार्थ्यांना योग्य कामगार मानले जात नाही, पण  स्टेशनवर तिकीट घेणं काही  फार त्रासदायक नव्हते, आणि काही वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर मला माझे तिकीट मिळाले आणि मी स्टेशन चा प्लॅटफॉर्म वर गेली , जे फारसे गर्दीदायक नव्हते.

स्टेशनवरील प्रत्येकाने मुखवटे(Mask) घातलेले होते. ट्रेनचा वेळापत्रकचा घोषणा देखील झाल्या, तसेच निर्देशकांवरही वेळ होती, पण गाड्या उशिरा आल्या. मी सीएसटी (CSMT) ही  ट्रेन पकडली, त्यात फारशी मानसरोवर स्टेशनला  गर्दी नव्हती आणि मला कॉर्नर सीट मिळाली.

खारगर – बेलापूर – सीवुड्स – नेरुळ ह्या स्टेशन नंतर  ट्रेन  पूर्वीसारखीच भरली गेली  तेथे कोणतेही सामाजिक अंतर( social Distances)  नव्हते, परंतु लोकांनी मुखवटे (Mask) घातले होते. मी येथे पूर्ण खुलासा करीत आहे. मी पण covid १९ ची रुग्ना होती,मी रोगप्रतिकारक शक्तीने बरे झाली,  परंतु यामुळे मला प्रतिकारशक्ती मिळते की नाही हे मला अद्याप माहित नाही, म्हणून मीपुन्हा एकदा  कुठली हि जोखीम घेत नाही.

ट्रेनचा प्रवास जलद चालूच होता, lockdown नंतरचा वर्षातील माझा पहिला ट्रेनचा प्रवास, खुप छान होता, परंतु यास बराच वेळ लागत होता. ह्या प्रवासामध्ये मला पाहिल्यान्दा वर्षभर नंतर शाळेत जाणारी बरीच मुले दिसली. ट्रेनमध्ये वस्तू विक्रेता देखील आले आणि त्यातील काही लहान मुलेही सामान विक्री करत  होती. कोणतेही पहिला सारखी धक्काबुकी नव्हती सगळे नियम न  वगळता हे सर्व अगदी सुरेख प्रवास करत होते. 

कुर्ला येथे चढणारा आणि उतरणाऱ्या लोकांची गर्दी नेहमी असते, आणि ह्यावेळेस पुन्हा गर्दी अनुभवायला भेटली. शेवटी, माझा स्टॉप वडाळा, जिथे मला मध्यभागी(Harbour line)ते पश्चिम (Western line) मार्गावर गाड्या बदलायची होती बांद्रा कडे जाण्यासाठी. मी वडाळा स्टेशन वर प्लैटफॉर्म  ४ वर उतरली  आणि बांद्रा कडेचा दिशेने  ट्रेन जाणाऱ्या असलेल्या प्लॅटफॉर्म १  वर पोहचली. निर्देशकांनी दुपारी १२;२३ वाजता दर्शविली पण ट्रेन दहा मिनिटांनी आसपास १२;३१ ला प्लॅटफॉर्म १ आली, त्यापूर्वी पनवेलसाठी दोन गाड्यादेखील आल्या पण त्या दिशानिर्देश वेळमध्ये  दिसत नव्हते , हे सर्व अगदी गोंधळात टाकणारे होते.

वडाळा रोडचा स्टेशन वरून गोरेगाव ट्रेन पकडला नंतर ३ स्टेशन वर  बांद्रा हा माझा शेवटच उत्तरायच स्थान आणि मी ट्रेनमधून खाली उतरले  तेव्हा मला जो आनंद झाला कारण अक्षरशः हा वेळ ताणारा प्रवास अगदी संपला. स्टेशन मधून बाहेर आल्यावर भयंकर गर्दी रिक्षावाले, सामान विकणारे आणि नवीन गोष्ट माझा साठी म्हणजे ह्या वर्षभराचा प्रवासा मध्ये पहिल्यांदा जेव्हा बांद्राला आल्यावर नवीन दिसणारी गोष्ट म्हणजे छोटी लाल बस (Mini Red Bus) हे सगळं खूप अगदी नवीन होत माझा साठी पण अनुभवणारा ट्रेनचा प्रवास होता. स्टेशनच्या  बाहेर असलेल्या ऑटोरिक्षा ने मला माझा शेवटचा ठिकाणा  वर शेवटी पोहचवलं St. Pauls’ Institute of Communication Education. Or SPICE.

कॉलेजच्या पहिल्या दिवशी  – टीव्ही स्टुडिओमध्ये प्रैक्टिकल. टेलिप्रोमीटरच्या मदतीने कॅमेर्‍यासमोर कसे बोलायचे ते आम्ही शिकलो. मजा आली. 

कृपया लक्षात ठेवा: आजचा दिवस एक चांगला दिवस होता,पण अनुभवलेला  हा  कालावधी खूप वेगळा आणि मजेशीर होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *